खेळायला छत्रीचा आधार

खेळायला छत्रीचा आधार


मुल ८/६/२०२०
सचिन वाकडे

सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. जगभरात जिवघेण्या कोरोना विषाणूने थैमान घातल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक घरात बंदिस्त आहेत. महत्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडणे पसंद करतानाचे चित्र आहे. अश्यात खेळण्याचे वय असलेले बालमन घरी थांबतील असे नाहि. पालक कितीही समजावले तरी ते शेवटी बालमनच, ऐकणार नाहित. खेळायला घराबाहेर जाण्यासाठी अडून बसणार. आणि त्यांच्या जिद्दीपुढे पालकांनाही माघार घ्यावी लागणार असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते.
घरी बंदिस्त आणि बाहेर आग ओकणारा सुर्यनारायण तथा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होण्याची भीती पालकांच्या मनात असल्याने त्यांनी बालकांना घरीच थांबण्याच्या सल्ला दिला. पालकांचा सल्ला बालकांनी धुडकावून लावत आयडियाची कल्पना वापरत नवी शक्कल लढविली.
मुल येथील बालविकास शाळेजवळील बच्चे कंपनीने नवी शक्कल लढवून तापमानापासून सुरक्षा व्हावी व आपोआप सोशल डिस्टंस पाळता यावा यासाठी चक्क छत्रीच्या आधार घेत खेळायला सुरुवात केली. बालकांच्या या युक्तीने पालकांच्याहि जीव भांड्यात पडला. कारण तापमानापासून सुरक्षा व सोशल डिस्टंस पाळल्या जात असल्याने बच्चे कंपनी घराशेजारी खेळत असल्याचे चित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!