प्रशासननाने वेळीच दखल न घेतल्याने जनतेमध्ये आक्रोश
तळोधी बा.अप्पर तालुक्यात दोन पाँझीटिव्ह रुग्ण आढळले असताना, प्रशासननाने वेळीच दखल न घेतल्याने जनतेमध्ये आक्रोश
तळोधी (यश कायरकर)
तळोधी बा.येथे जळगांव येथून आलेल्या व्यक्तीचा कोरोणा पाँझीटिव्ह नमुना अहवाल तसेच तळोधी बा. ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजापूर येथे ओडिसा वरुन आलेल्या व्यक्तीचा पाँझीटिव्ह अहवाल निघाला. आलेला हा युवक कोरोना पॉझिटिव निघालेला आहे.
नागभीड तालुक्यात एकुण चार पाझीटिव्ह झाले आहेत.
तळोधी क्षेत्रातच ओडिसा वरून वैजापूर येथे आलेला ४० वर्षीय पुरुष पाझीटिव्ह निघालेला आहे. व आज वैजापूर गांव सिल करुन लोकांनी विषेश काळजी घ्यावी असे सांगितले आहे
विषेश म्हणजे वैजापूर बद्दल विश्वस्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णासोबतच पुन्हा ७ व्यक्ती एकत्र प्रवास करत आले आहेत. मात्र फक्त दोनच दिवस त्यांना कोरंटाईन ठेवन्यात आले व नंतर ते बाहेर फिरत असल्याचे सांगितले आहे.
कोरोना सारख्या गंभीर बिमारी बद्दल कुठल्याही प्रकारची गंभीरता न दाखवीता गावच्या सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य विभाग व गावची कोरोना समीतीच्या निस्काळजीपना मुळे वैजापूर गांवच नाही तर परिसरात सुध्दा धोका निर्माण झाला आहे.
मात्र तालुका प्रशासन व पोलिस विभागाने वेळीच दखल न घेतल्याने सकाळच्या वेळेस जनतेमध्ये प्रशासनविरोधात आक्रोश निर्माण झालेला दिसून आला.
अप्पर तालुक्यात दोन पाँझीटिव्ह रुग्ण निघाल्याने सकाळी तळोधी बा. येथील ग्रामपंचायतच्या वतीने बाजारपेठ तात्काळ बंद करन्यात आली . व्यापारी असोसिएशन ने दोन दिवसासाठी बंद करण्याचे जनतेला आव्हान करुन बंद ठेवन्यात आले आहे. व पाँझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा स्लँब घेण्यात आले . तळोधी बा. येथील अप्पर तालुका कार्यालय काँलनीत राहत असलेल्या कोरोणा पाँझीटिव्ह रुगनाला रात्रीचे वेळेस १०८ अँम्बुलन्स गाडीने चंद्रपूर हलविण्यात आले.
आज सकाळी प्रशासननाने अप्पर तहसिल कार्यालय परीसर सिल करण्यात आला आहे. तालुका प्रशासन व पोलिस प्रशासन च्या वतीने गावातून जनजागृतीसाठी लाँग मार्च काढण्यात आला. यावेळी तहसिलदार मनोहर चव्हान,संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे, ठाणेदार रोशन शिरसाठ, तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद मडावी, ग्रामविकास अधिकारी लांबट, मंडल अधिकारी व ग्रामीण पत्रकार संघाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.
तळोधी बा. येथील पाझीटिव्ह रुग्ण शेजारी काँलनीत ३ तारखेपासून जळगाव येथून आलेला रुगनाचा काल पाँझीटिव्ह अहवाल निघाले असताना याच कालनीत ब्रम्हपूरी तालुक्यातील अंगनवाडी आहार वाटप करणारे ९ मजूर व रोडचे बांधकाम करणारे ३ लोक येथे राहत होते. मात्र प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने ते मजूर सकाळीच निघून गेले व त्या लोकांशी संपर्क केला असता मोबाईल बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच तळोधी बा.येथील जनतेच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
मात्र जनतेनी काळजी करणचे सोडून काळजी घेतली पाहिजे हे महत्त्वाचे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!