नागभीड तालुक्यातील "ते" परिसर सील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
तळोधी (यश कायरकर)
नागभीड येथे आज कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सदर रुग्नाला आजच चंद्रपुर येथे हलविण्यात येत आहे. सदर रुग्ण आढळल्याने बोथली रोड, गंगामाता परिसर, शिवाजी चौक बौद्ध विहार परीसर, चवडेश्वरी मंदिर परिसर, धनगर मोहल्ला (कंटेनमेंट झोन) हा परिसर आजच सिल करण्यात येत आहे. या परिसरातुन शासन नियमाप्रमाणे कोनालाहि बाहेर पडता येनार नाहि. अत्यावश्यक सेवेसाठी प्रत्येक मार्गावर नगर परिषदचे कर्मचारी सेवेत असनार आहेत.कोणाला कुठल्याहि गोष्टींची गरज पडली तर या परिसरात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या द्वारे गरज पुर्ण करुण घ्यावी लागणार आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर सर्व घरी दिले जाणार आहेत. कुणीही घाबरुन जाऊ नये. सर्वांनी घरीच थांबावे. मास्कचा वापर करावा. नगर परिषद प्रशासन, आरोग्य प्रशासन, तहसिल प्रशासन, पोलीस विभाग यांना सहकार्य करावे.....!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!