माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामडळा चा राज्य सरकारला इशारा





माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती सुरु झाल्याशिवाय कामावर हजर होणार नाही

मागील १५ वर्षापासून पदभरती बंद

मुख्यमंत्री ,शिक्षण मंत्री, राज्य शिक्षण मंत्री याना निवेदन देऊन दिला इशारा

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - सन २००५ पासून महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा मध्ये शिक्षकेत्तर कर्मचार्याच्या भरतीवर बंदी आहे या कालखंडात अनेक शाळेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळे राज्यातील ४५ हजाराच्या वर शिक्षकेत्तर कर्मचारयांची पदे रिक्त आहेत यामध्ये चतूर्थ श्रेणी कर्मचारी ,शिपाई ,सेवक यांची संख्या खुप मोठी आहे त्यामुळे ही पदभरती  व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर हजर होणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामडळा नी राज्य सरकारला दिले आहे. देशात कोरोना विषाणू चे थैमान सुरु असून शाळा जुलै महिन्यात सुरु होणार परन्तु माध्यमिक शाळेची दयनीय अवस्था असून चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यात लिपिक शिपाई ग्रंथपाल सेवक यांची संख्या कमी आहे तसेच काही मोठ्या शाळेत ४ ते ५ शिपाई पदे आहेत त्या शाळेत आता एकहि शिपाई नाही एवडी कमतरता असताना त्यांची कामे कोन करणार हा प्रश्न निर्माण होतो त्यात शाळे ची स्वछता मुलांच्या आरोग्यची देखभाल परिसर स्वछता कोन करणार तसेच इतर शालेय कामे कोंन करणार तसेच ग्रंथपाल नसेल तर पुस्तकें कोंन देणार आणि लिपिक नसेल तर शाळेचा कारभार कोंन करणार  म्हणून चतुर्थ क्षेणी कर्मचारी महत्वाचा आहे परन्तु २००५ पासून त्यांची भरती शासनाने बंद केली गेल्या पंधरा वर्षा पासून माध्यमिक शिक्षकेत्तर मडळ पद भरती संदर्भात शासनकडे पाठ पुरवठा करीत आहे.
अनेक प्रलंबित प्रश्न सोडविन्यासाठी अर्ज निवेदन आंदोलने चर्चा संप करित आहे परन्तु या सर्व बाबिकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे कर्मचार्याच्या आकृतिबंधाच्या नावाखाली १५ वर्षे ही भरती बंद ठेवण्यात आली परन्तु काही झारीच्या शुक्रचार्या मुळे ही भरती होऊ शकली नाही जर का आता शाळा सुरु झाल्या तर शाळा  या कर्मचार्या वीना कश्या चलवाव्या असा प्रश्न निर्माण होतो असा सवाल माध्यमिक महामंडलाने केला आहे शासनाने शिक्षकेत्तर कर्मचार्याचे प्रलंबित प्रश्न सोड़वावे त्यात १ शासननियुक्त समितिने शिफारिस केल्यानुसार  नुसार शिक्षकेत्तर कर्मचार्याची अनुकंपासह तत्काल भरती करावी त्यात शिपाई,सेवक,ग्रंथपाल, प्रयोगशाला सहाय्यक २ बक्षी समितिने शिफारिश केल्याप्रमाने १०,२०,३० वर्षा नतरचा लाभ तत्काल लागू करावे ३ मा शाळे तिल शिक्षकेत्तर कर्मचारयाना २४ वर्षाचा लाभ माननीय उच्च न्यायालया च्या निर्णयानुसार तत्काल द्यावे ४ राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचार्याना यापूर्वीच्या पदोन्नति ची मान्यता तत्काल द्यावे ५ रिक्त जागेवर तत्काल पदभरती करावी               अश्या अनेक प्रलंबित मागण्या असून राज्य शासनाने तत्काल अंमलबजावणी करुण पूर्ण कराव्यात अशी मागणी होत आहेत याबाबत शिक्षकेत्तर राज्य कार्यकारणी ची सभा नुकतीच गुगुल मिटवर आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला जोपर्यंत शिक्षकेत्तर कर्मचार्याच्या प्रलंबित प्रश्ना कड़े लक्ष देत नाही किवा त्यांची सोडवणूक करीत नाही तोपर्यंत राज्यातील माध्यमिक शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या कामावर हजर होणार नाहीत असा इशारा  राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे याना निवेदनाद्वारे दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेत्तर संघटना महमडळाचे अध्यक्ष अनिल माने कार्याअध्यक्ष मोरेश्वरजी वासेकर महासचिव शिवाजी खांडेकर यानी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!