अज्ञात व्यक्तीकडून शेत कंपाऊंडची जाळपोळ हजारोचे नुकसान
शेतातील कम्पाऊंचे काही अज्ञात व्यक्तीकडून जाळपोळ करून हजारोचे नुकसान
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल ( चंद्रपूर )
मौजा मूल तालुक्यातील गोंडी विहिरगाव शेत शिवारातील सर्वे क्र. 75 आराजी 2.36 भेंडारे नामक व्यक्तीचे असून सदर शेता मध्ये सदर व्यक्तीने आपल्या शेतातील मालाचे रक्षण करण्या करीता सभोवताल बांबूचे कुंपण तयार केले होते परंतु काही अज्ञात व्यक्तीने सुळबुद्धीने सदर कम्पाऊंचे आग लावून नुकसान केले.
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, मौजा भेंडारे नामक व्यक्तीची शेती मूल रोडला महाबीजचा मागे असून यांचा व्यवसाय शेती हा आहे. या शेतामध्ये ते दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात पिके घेत असतात. आपल्या पिकाच रक्षण करण्या करिता त्यांचा शेतात सभोवताल बांबूचे कुंपण केले होते. परंतु सध्या खरीप हंगाम तोंडावर असतांना व शेतातील साफ सफाईचे कामे सुरू असतांना काही अज्ञात समाज कंटकांनी त्यांचा शेतातील कुंपणाला आग लावून दिली. यामुळे सदर शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान झाले असून, सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्या करीता अज्ञान व्यक्ती विरुद्ध त्यांनी पोलीस स्टेशन मूल येथे एफआयआरमध्ये नोंद केली आहे. तरी सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितावर कळक कारवाही करण्यात यावी अशी भेंडारे या शेतकऱ्याची मागणी आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!