संविधान विरोधी लिखान - आरोपीवर कारवाई नाही
बल्लारपूर (प्रतिनिधी)
संविधान विरोधात फेसबुक वर विकृत लिखाण करणारर्यावर पोलिसांनी अजून पर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संदिप कुकडपवार मु.पो रामाळा तलाव जवळ चंद्रपूर या व्यक्तीने स्वतःच्या फेसबुक पेज वर संविधान विरोधी आणि समाजात ST/SC च्या विरोधात गैरसमज पसरवून दंगली घडविन्याच्या उद्देशाने पोस्ष्ट केलेली होती.त्या विरोधात जन आधार अधिवक्ता संघ चंद्रपूर यांनी दिनांक 30/05/2020 रोजी शहर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे रितसर तक्रार दाखल केली.पण वकील संघाने मागनी करुनही पोलिस स्टेशन चंद्रपूर ने आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.वकील संघाने मागणी जोरदार लावून धरल्याने वकीलांच्या समाधानासाठी पोलिसांनी आरोपींवर IPC कलम 153 A,आणि कलम 295 A लावुन वापस पाठविले.हा गुन्हा अदखलपाञ असतांनाही आरोपिस अटक करण्यात आली नाही किवा इतर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.म्हणून वकिल संघाने दि.03/06/2020 ला sp साहेबांना आरोपीवर कलम 124 A,UAPA कायदा कलम 15 आणि IT कायदा कलम 66 लावण्याची मागनी करुन दोषिंवर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले.त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनानीही याला समर्थन देत SP साहेबांना दोषींवर कलम 124 A,UAPA कायदा कलम 15 आणि IT कायदा कलम 66 लावण्याची आणि कारवाई करण्यांची मागणी करणारे निवेदने केलेत पण तब्बल 6 दिवस उलटूनही दोषींवर कुठलीच कारवाई पोलिसांनी केली नाही अथवा IPC कलम 124A,UAPA कलम15 आणि IT कलम 66 सुद्धा लावण्यात आले नाही म्हणून जन आधार अधिवक्ता संघातर्फे दिनांक 05/06/2020 ला गृहमंत्री मा.अनिल देशमुख साहेबांना निवेदन देउन चंद्रपूर प्रेस कल्ब तर्फे प्रेस कान्फरंन्स घेण्यात आली ज्यात पञकारांना संपुर्ण प्रकरणाची माहीती देण्यात आली.जन आधार अधिवक्ता संघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर लायर संघटना ,मराठा सेवा संघ,मुस्लिम संघर्ष समिती,ओबिसी कृती समन्वय समिती,संविधान संवर्धन समिती अशा विवीध संघटनांचे प्रतीनिधी उपस्थित होते.ज्यात ॲड.फरहद बेग ,ॲड.प्रशांत गहाणे,डॉ अभिलाषा गावतुरे,ॲड.सुरज वाळके ,प्रा.मालेकर सर ,यांनी सविस्तर माहीती दिली.संविधान हमारे लिए खतरा है,ये संविधान जातीयवादी है.संविधान तर फक्त जातीयवादच शिकवितो अशा प्रकारचा मजकुर आणि स्वयंघोषित विश्वरत्नाला हे माहीत नव्हते का? अशाप्रकारचा मजकूर आरोपीने फेसबुकवर टाकला म्हणजे आरोपी संविधान नाकारुन देशद्रोह करतोय.त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता प ण येवढ्या दिवसात पोलिसांनी कुठलीच कार्यवाही केलेली नाही यावरुन पोलिसांनी प्रशासन आणि शासनातील काही लोक देशद्रोहीनचे संरक्षण करत आहेत की काय हा प्रश्न पडतोय.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!