भटारीत बारा वर्षाच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू
पोंभुर्णा (प्रविण चिचघरे)
पोंभुर्णा तालुक्यातील भटारी येथील तलावात १२ वर्षाचा आदिवासी मुलगा खोल पाण्यात बुडून मरण पावल्याची दुःखद घटना आज घडली.
गटारी या आदिवासी गावातील त्तलावात लहान मुल रोज पोहायला जात असतात. पण आज काळान घात घातला. सायंकाळी भटारी येथील तलावात लहान मुल पोहायला गेले. मारोती कोवे यांचा मोठा मुलगा कार्तिक मारोती कोवे (वय १२) हा सुद्धा त्या मुला सोबत पोहायला गेला असता. तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. हि घटना सायंकाळी 04:00 च्या सुमारास घडली. हि बातमी गावात कळताच गावातील नागरिक तलावा कडे धाव घेतले. परंतु खुप वेळ झाल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. हि बातमी ऐकून घरच्यांना धक्का बसला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. हि बातमी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन कळवण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!