आयुष्य

आयुष्य


रेश्मा गेडाम
मारोडा (मूल)
...
किती सोप्पं वाटतं ना हे शब्द!!
पण,
आयुष्य जगणं मात्र खूप अवघड असतं!!
कधी कठीण तर कधी सोप्या परिस्तिथीना झुंज देत सामोर जहावं लागतं.
कधी - कधी याच आयुष्यात खूप मित्र- मैत्रिणी येतात. चांगले, वाईट, प्रेमळ, मायाळू दया करणारे, साथ देणारे, आणि साथ सोडून जाणारे सुध्दा.!!!
या जगात येताना प्रत्येक व्यक्ती देह घेऊन तर येतात, पण नाव नसतो.
आणि जाताना नाव घेऊन जातात, पण देह मात्र नसतो. किती आश्चर्य!! वाटतो ना!
विचार केल्यावर ज्या वेळी आनंद असतो, तेव्हा लोक समोर असतात. उदा:- लग्न!!

पण तेच लोक दुःखा च्या वेळीं मागे असतात,
उदा:- स्मशान भूमित जाताना.
असं का??

या नियतीच गणित मांडताच येत नाही.
कधी काय होईल, याची कल्पना नसते, मात्र काहीं झालंस तर वेळेला दोष दिल्या जात.
कधी हव्याची झुळूक आली, तर तिला खूप आलिंगन घ्यावस वाटत. आणि तीच झुळूक एक वादळ बनून आल. तर मात्र आपल्याला कुठं घेऊन जाणार याच भान सुध्दा राहत नाही।। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाईट वेळ येत असते , पण तीच वेळ आपल्याला खूप काही शिकाऊन जाते  हे मात्र विसरून जातो।। 
या आयुष्यात जगताना दुःख खूप येतात,  पण जो या दुःखाना 
समोर जातो त्यालाच आयुष्याचं अर्थ कळतो। 
आणि आयुष्यात वाईट वेळ यासाठी येते की, आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळावी।।
हे आयुष्य किती वेगळं आहे. 
कधी सुखाचा सागर।।।  तर कधी,
दुःखाचा पहाड।।। 

जन्म आणि मृत्यू मानवाला एकदाच मिळतात.  
म्हणून या जगात आनंदाने आणि हसत - खेळत जगण  हेच आयुष्य आहे......!!!!!!

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!