चिमूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाकडे कमालीचे दुर्लक्ष,लाखो रुपयांचा महसूल बुडाला
जिल्हाधिकाऱ्यांनी,वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी
सर्व मुरुम उत्खनंनाच्या स्थळाचे मोजमाप होणे आवश्यक
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्याअंतर्गत गौण खनिज मध्ये समाविष्ट असलेल्या मुरुमाचे लिज द्वारे उत्खनन सुरु आहे.मात्र,५० ब्रास मुरुम उत्खनंन करण्याची परवानगी दिली असेल तर त्याच्या चौपट किंवा त्याही पेक्षा जास्त मुरुमांचे उत्खनंन केले जात असल्याची आरडा ओरड,चिमूर तालुक्यातील जाणकार जनतेची आहे.
लिजच्या पडद्याआड मुरुमाचे होणारे भरमसाठ अवैध उत्खनन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत ठरतो आहे.तद्वतच रस्त्याची क्षमता नसताना,१० चक्याच्या हायवा गाड्या मुरुम नेण्यासाठी उपयोगात आणल्या जात आहेत. मुरुम उत्खनन लिज देतांना गाड्यांचे नंबर नमुद करण्याची व गाडी मालकांचे नाव नमुद करण्याची कार्यप्रणाली वा कार्यपद्धत आहे.

मात्र,चिमूर तालुक्यात अशा कार्यप्रणालीला वा कार्यपद्धतीला बघल दिले जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे.परत मुरुम व माती चे उत्खनंन करतांना ३ फुटांच्या आत खोदकाम करता येत नाही.परंतू १५ फुटांपर्यंत खोल मुरुमाचे उत्खनन करण्यात आले असल्याचे वास्तव्य आहे.या वास्तव्यात नेमके काय दडलेले आहे.
याची चौकशी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याऐवजी,वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करणे अनिवार्य असल्याचा सुर जनतेत आहे.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत अवैध मुरुम उत्खनंनाची चौकशी झाल्यास अनेक मासे गळाला लटकण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!