सावली तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
सावली (दिनेश घाटे)
तालुक्यातील चकपिरंजी गावात बिबट्यानी धुमाकूळ घातल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
काल रात्री १२ वाजताच्या दरम्यान बिबट चेकपिरंजी गावातील सदाशिव कस्तुरे यांच्या घरात घुसून एक शेळी ठार केली. दिल्लीप गेडाम याच्या घरची सुुद्धा एक शेळी ठार केली आहे. त्यामुळे गावात आता खूप भितीचे वातावरण तयार झाल आहे.
वनविभागाने या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!