दारुसह 2 लाख 67 हजाराचा मुद्देमाल पकडण्यास राज्य उत्पादन शुल्कला यश
चंद्रपुर ते यवतमाळ हा मुख्य रास्ता बंद करण्यात आल्यामुळें अवैध दारू तस्करानी आड मार्गाने दारू तस्करी सुरू केलेली आहे या मार्गाने चार चाकी गाडी ने दारू तस्करीची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने घुग्घुस येेथेे सायंकाळी छापा टाकून देशी दारू चे 26 पेटीचा माल व दोन लाखांची गाडी एकूण 2 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिनेमा स्टाईल ने गाडी क्रमांक MH34 K 6334 पाठलाग करून पकडण्यात आले. घटना स्थळावरून दारू तस्कर पळून जाण्यास यशस्वी झाले. हे कारवाही उत्पादन शुल्क चे अधीक्षक सागर घुमकर यांच्या मार्गदर्शनास, निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वात पथकांनी केली व पुढील तपास सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!