घर देता काहो घर !एक वर्षांपासून तिन कुंटुबाचा संसार समाज मंदिरातच #gharkul
कुणी घर देता काहो घर …...
एक वर्षांपासून तिन कुंटुबाचा संसार समाज मंदिरातच
मागील वर्षीच्या पावसाने पडले होते घर
चिमूर (प्रतिनिधी)
चिमुर तालुक्यातील झरी येथील गुलाब व दिवाकर मारोती शेंडे या दोघाही भावांचे मागील वर्षाच्या पावसाळ्या घर पडले. मात्र घरी अठरा विश्व दारिद्र्य असल्याने घर बांधु शकले नाही किंवा कोणत्याही प्रकारची शासकिय मदत अथवा घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामूळे मागील पावसाळया पासुन हे दोघेही भाऊ व गुलाब यांचा मुलगा दयाराम असे तिन कुंटूबांनी समाज मंदिरात संसार थाटला आहे. आणी घर देता काहो घर अशी याचणा समाज व शासनाला करीत आहेत.
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगत असलेले पाचशे लोकवस्ति असलेले झरी मंगरुड हे गाव आहे .या गावाचा समावेश बंदर (शिवापूर) गट ग्रामपंचायत मध्ये होतो. इथे पूर्वजपासून वास्तव्य असलेल्या दिवाकर मारोती शेंडे व गुलाब मारोती शेंडे हे दोन भाऊ व मूलगा अत्पशी शेती, शेतमजूरी तथा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाची गुजरान चालवितात. आणी वडिलोपार्जीत मोडकडीस आलेल्या घराच्या आसऱ्याने राहत होते .मात्र हाही आसरा मागील वर्षीच्या धुवाधार पावसाने पडल्याने हे तिन्ही कुंटूब बेघर झाले.
तेव्हा पासुन गावातील समाज मंदीरात आसरा घेतला.
पडलेल्या घराचे व झालेल्या सर्व नुकसानीचे महसूल विभागाने तलाठी, ग्रामसेवक मार्फत पंचनामा केला. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटून गेला तरी एक पैशाचीही साधी मदत शासनाकडून मिळालीलेली नाही. तर ग्रामपंचायत मार्फत या तिन्ही कुटुंबातील प्रामुख्याने ग्रामपंचायत बंदर मार्फत घरकुल साठी अर्ज सादर केले. मात्र याही योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. दारीद्रय रेषेखालील कुटूंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळतो तर दारीद्रयात असलेल्या हा कुटूंब लाभा पासुन अजूनही वंचीत आहे. त्यामूळे घराचे स्वप्नरंजनातच अजुन कीती दिवस जगावे लागेल असा प्रश्न या कुंटूबाना पडला आहे.
आम्ही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहोत तसेच मागच्या पावसात आमचे घर पडले त्यामुळे आम्ही एक वर्षांपासून तीन परिवार समाज मंदिरात राहत आहोत पंचायत समीतीकडे अर्ज केला व विचारणा केली असता अधिकारी म्हणतात तुमच्या गावला टार्गेट नाही तेव्हा आम्ही काय करावे? गुलाब शेंडे, दिवाकर शेंडेझरी (मांगरूड) तह चिमूर
गुलाब शेंडे,दिवाकर शेंडे व दयाराम शेंडे यांचे घर मागच्या वर्षी पावसाने पडले आहे ते सध्या समाज मंदिरात राहत आहेत हे तिन्ही परिवार दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यामुळे पंचायत समिती चिमूर कडे ग्रामपंचायत मार्फ़त घरकुल साठी अर्ज पाठवला मात्र अजूनही त्याचे घरकुल मंजूर झाले नाही तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत तेव्हा विशेष गरजवंत म्हणून या परिवाराना घरकुल मंजुर करून द्यावे -वासुदेव बावणे उपसरपंच गट ग्रामपंचायत





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!