असोला मेंढा तलावात भरपुर पाणी असल्याने पुराचा धोका #Overflo
असोला मेंढा तलावात भरपुर पाणी असल्याने पुराचा धोका
शेतक-यांच्या शेतीची नुकसान होण्याची शक्यता
विद्यार्थी शिक्षना पासुन वंचित राहणार
सामदा व कन्हाळगाव हे दोन गावे चिंतेत
यावर्षी पर्यटकाना लवकर मिळनार
वेस्टवेअरचा आनंद
जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही प्रतीनिधी):-
दरवर्षी असोलामेंढा तलावामध्ये पाणी कमी असायचा.त्यामुळे तलाव भरायला वेळ लागायचा. परंतु गोसेखुर्दचा नहर उसरपार चक सावंगी मार्गे डायरेक्ट असोला मेंढा तलावात टाकल्याने तलावात भरपुर पाणी आहे.
यावर्षी पाहीजे त्या प्रमानात दुबार पिक शेतकर्यांनी घेतला नसल्याने पाणी खर्चच झाला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी सारखीच आहे.
असोला मेंढा तलाव यावर्षी भरूनच आहे. ओव्हर फ्लो जवळच पाण्याची पातळी आहे.
असोला मेंढा तलावात पाणी आननारा स्त्रोत्र म्हणजे एक नाला आहे. हा नाला दुरून येत असल्याने ह्याच नाल्याच्या भरवशावर असोला मेंढा तलाव असायचा. या नाल्याला पुरआला की तलाव लवकर भरायचा. पुर्वीचा पूर लवकर ओसरायचा. त्यामुळे शेत्या लवकर खुले व्हायचे व शेतीचे पिक उत्पन्न मिळत होते.
यावर्षी असोला मेंढा तलावात भरपुर पाणी असल्याने जर नाल्याला एक किंवा दोन पूर आले तर तलावाचा वेस्टवेअर पर्यंत पाणी लवकर जाईल.वेस्टवेअर पर्यंत पाणी गेला किंवा वेस्टवेअर निघला तर नाल्याचा पाणी थोपुन राहील. नाल्याला पूर राहील. नाल्याचा पाणी लवकर पास होनार नाही. त्यामुळे सामदा ,कन्हाळगांव ,टेकरी पवनपार ,पवना येथील शेतक-यांच्या शेती पाण्यातच( पूरातच) राहतात.त्यामुळे शेतक-यांच्या शेतीची नुकसान होण्याची शंका शेतकर्याकडुन व्यक्त केली जात आहे.
सदर नाला हा सामदा व सेलदा गावालगत गेला आहे. सामदा व सेलदा येथील विद्यार्थी पवनपार येथील शाळेत शिकायला येतात .या विद्यार्थ्यांना हाच नाला ओलांडुन यावा लागते.
आताच या नाल्याला पाणी आहे. तर पावसात परीस्थिती बिकट होत असल्याचे पालकांकडुन सांगितल्या जात आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षनिक नुकसान होण्याचा संभाव्य धोका निर्माण होत असल्याचे पालकाकडुन व्यक्त केली जात
नाल्याला पूर लवकर येत असल्याने पवनपार येथील शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना लवकर सोडावे लागते. तर कधी कधी परीस्थिती पाहुन येथील शिक्षकांना विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहोचवावे लागते.
एकीकडे समस्या निर्माण होत आहे तर दुसरी कडे आनंद.असोला मेंढा तलावात मुबलक पाण्याचा साठा असल्याने यावर्षी वेस्टवेअर लवकर निघनार त्यामुळे पर्यटकांना त्याचा आनंद मिळनार आहे.
असोला मेंढा तलावाचा वेस्टवेअर आकर्षक असल्याने अनेक दुरून चे पर्यटक आनंद लुटायला येत असतात हे विशेष.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!