घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक जीवित हानी होता - होता टळली
मेटेपार येथे घडली घटना
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.१०/०६/२०२० चिमुर तालुक्यातील जांभूळघाट येथुन जवळच असलेल्या मेटेपार येथे सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून खाक झाले. यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी नाही झाल्यामुळे मोठा अंनर्थ टळला.जांभुळघाट जवळील मेटेपार येथे दुपारी ३ वाजताच्या दरम्यान सुनंदा सरपाते ही महिला गैस वर चहा मांडायला गेली असता गैस ने अचानक पेट घेतला असता त्यांच भीतिने तिची आई पार्वता वाघ व मुलगी दोघेही घराबाहेर पडाल्या व आरडा ओरड करण्यास सुरुवात झाल्यावर गावकरानी आगिला आटोक्यात आनन्याचा प्रयत्न केला.
पन सिलेंडरचा स्फोट झाल्याने राहते घर व जीवना उपयोगी सहित्याची राख रांगोली झाली.सुदैवाने शेजारील घरांना काहिही बाधा पोहोचली नाही.पार्वताबाई वाघ यांचे दोन लाखाचे नुकसान झाले असून घटनास्थली गावकरी यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले असतानाच चिमुर वरुण नगर परिषद ची अग्निशमक गाड़ी घटनास्थली दाखल झाली.घटनास्थली तलाठी जीवन येरमे यांनी भेट देत झालेल्या नुकसानिचा पंचनामा केला. झालेल्या नुकसानिची मदत तत्काल शासनामार्फत मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!