५ शेतकऱ्यांचा जीव घेऊन दहशत माजविणाऱ्या वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला आले यश




जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या कोलारा परिसरात फरवरी महिन्या पासुन ४ जुन पर्यंत दोन महिला व ३ पुरुष असे ५ जणांना वाघाने ठार केले. व मासळ मदनापूर जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी वनविभागाला वाघास पकडण्याची मागणी केली होती. व त्यांच्या मागणीला बघून वनविभागाने परिस्थितीचा आढावा घेत या वाघाला ठार करण्या करीता वरीष्ठ पातळीवरून शासन आदेश काढले. आज सकाळ पासुन या वाघाला जेरबंद करण्या करीता २६ अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून मोहीम राबविली व अखेर सायंकाळी ०५ : ०० वाजताच्या सुमारास चैती वन संरक्षीत क्षेत्रातुन के.टी.वन वाघास जेरबंद करण्यात यश आले . ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असुन हे व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी वाघ , बिबट , हरीण , अस्वल ,पशु पक्षी , व अन्य प्राण्यांना बघण्यासाठी भारतीय तसेच विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य आजाराने जगभरात थैमान घातले असून मृतकांच्या आकडेवारी मध्ये दररोज वाढ होतांना दिसत आहे.यामुळे वन्य प्राण्यांच्या सहवासात जनता येऊन वन्य प्राण्यांना याची लगन होऊ नये म्हणून ताडोबा जंगल सफारी बंद करण्यात आली.व youtube चैनल च्या माध्यमातून दैनंदिन प्राण्यांची कॅमेरॅने टिपलेली  व्हिडिओ दाखविण्यात येत आहे. आणि वाघांची संख्या वाढली असून वाघांना ताडोबा अभयारण्य व वनक्षेत्र कमी पडत आहे . ज्यामूळे वन्यप्राणी आणि माणवी संघर्ष वाढलेले दिसून येत आहे .कोलारा परीसरात मागील ३ महिन्या पासुन आज पर्यंत ५ वाघाने शेतकरी नागरीकांना ठार केले .मार्च महिन्यात जागली करण्या करीता गेलेल्या कोलारा येथील बालाजी वाघमारे , ८ एप्रिला मोहफुल वेचणाऱ्या सातारा येथील यमूना पांडूरंग गायकवाड ,१९ मे २०२० ला तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या कोलारा येथील लिलाबाई चंद्रभान जिवतोडे, ३ दिवसापुर्वी ४ जुनला स्वतःच्या शेतात कुंपन करण्या करीता गेलेल्या बामनगाव येथील राज्यपाल दयाराम नागोसे व शेतावर गेलेल्या कोलारा येथील राजेश्वर दडमल असे वाघाच्या हल्यात ५ बळी गेले .
सततच्या वाघाच्या हल्याने परीसरात दहशत निर्माण झाली असुन या वाघाचा तातळीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत होती .त्याप्रमाणे वरीष्ट पातळीवरून या वाघाला जेर बंद करण्याचे आदेश काढण्यात आले . वाघाच्या हालचालीवर ट्रॅप कॅमेरॅद्वारे नजर ठेवण्यात आली होती त्यावरूण हा टि.वन.वाघ चैती संरक्षीत वन क्षेत्रात असल्याचा शोध लागला .त्याप्रमाणे त्याला बेहोश करण्या करीता विशेष पथक दबा धरून होते . अखेर अधिकाऱ्यांना सांयकाळी ०५:०० वाजता वाघास पकडण्यात यश आले . ही मोहीम वरीष्ठ अधिकारी लडकट , खोरे , जाधव , व्याघ्र संरक्षण दलाच्या जाधव , आर .एफ.ओ. शेन्डे , चव्हाण , आर.ओ.कोडापे व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून हि कारवाई पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!