पब्लिक पंचनामाची बातमी आणि पंचायत समिती सावलीचे आवाहन
सावली (प्रतिनिधी)
घरकुल लाभार्थ्यांनी अनुदानासाठी कोणत्याही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पैसे देऊ नये असे आवाहन, सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार आणि संवर्ग विकास अधिकारी यांनी केले आहे.
पंचायत समिती घरकुल लाभार्थ्यांकडून पाचशे ते हजार रुपये घेतले जात असल्याचे वृत्त पब्लिक पंचनामा न्यूज पोर्टल वर प्रकाशित होताच, या वृत्ताची दखल घेत संवर्ग विकास अधिकारी, आणि पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी समाज माध्यमात याबाबतचे आवाहन करणारी पोस्ट प्रसारित केली.
काय केले आवाहन?
"घरकुलधारकांना सूचना... पंचायत समितीमार्फत पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या घरकुलाच्या योजना राबविण्यात येतात. घरकुल ही वैयक्तिक लाभाची योजना असल्यामुळे अधिकारी/पदाधिकारी/कर्मचारी यांना पैसे देण्याची गरज नाही. मात्र पब्लिक पंचनामा या पोर्टल न्यूजवर लाभार्थीकडून 500,1000 रुपये कर्मचारी घेत असल्याची बातमी प्रकाशित झालेली आहे. असे प्रकरण असल्यास संवर्ग विकास अधिकारी, सभापती यांचेकडे लेखी तक्रार द्यावी. यापुढे पंचायत समितीमध्ये घरकुल व इतर कामाबाबत कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये."



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!