अवैध सागवानची चौकशी सोडून वरिष्ठ वनअधिकारी बदली आदेश काढण्यात व्यस्त

अवैध सागवानची चौकशी सोडून वरिष्ठ वनअधिकारी बदली आदेश काढण्यात व्यस्त...

भिसी उपवन क्षेत्रातील अवैध साग तस्करी प्रकरणावर पांघरून


शंकरपूर (जगदीश पेंदाम)

         भिसी उपवन क्षेत्रात मागील एप्रिल - मे महिन्यात अवैध सागवानने हादरून सोडले होते. यामध्ये तब्बल 6 ते 7 अवैध साग तोडचे प्रकरण उघडकीस आणून वनविकास महामंडळचे परिमंडळ अधिकारी रमेश बलैया यांनी शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त करून दिला. जे कर्मचारी कर्तव्यावर तत्पर असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देऊन जंगलाचा ऱ्हास होण्यापासून ज्यांनी जंगल वाचविले त्याच वन कर्मचार्यावर दोषारोप पत्र तयार करून  बदली आदेश देऊन तडकाफडकी चिचपल्ली येथे रुजू होण्यास वरिष्ठ अधिकाऱयांनी आदेश दिले. हे सर्व वरिष्ठ अधिकारी हेतुपुरस्पर करीत असून, अवैध साग कटाई, अवैध रेती तस्करांना वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी एक प्रकारे या तस्करांना अभय देत असल्याचे तालुक्यात बोलल्या जात आहे. ज्या उपवन क्षेत्रात 6 ते 7 ठिकाणी लाखो रुपयांचे अवैध सागतोड झाली त्या क्षेत्रातील सविस्तर चौकशी होऊन वनरक्षक व क्षेत्र सहाय्यक (वनपाल) यांच्यावर कडक कारवाई करण्याचे गरजेचे होते. मात्र वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी भिसी प्रकरणाची थातुरमातूर चौकशी करून लाखो रुपयांचे अवैध साग तोड झालेले प्रकरणावर पांघरून घालून दाबण्याचा प्रकार तर करीत नाही ना...! अशी चर्चा सर्वत्र रंगत असून, सोशल मिडियावर सुद्धा भिसी येथील अवैध साग प्रकरणाचे काय झाले. अशी विचारणा होते आहे. या सर्व बाबीकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकारी हे लाखो रुपयांचे अवैध साग तोड झालेल्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याऐवजी उलट त्यांच्यावर  शिस्तभंगाची कारवाई करून  बदली आदेश काढण्यात व त्यांच्यावर दोषारोप प्रस्ताव काढण्यात वनअधिकारी व्यस्त असून, त्या कर्तबगार कर्तव्यदक्ष ज्यांनी जीवाची बाजी लावून लाखो रुपयांचा अवैध सागवान पकडून दिले त्यांचीच आज  आदेश देऊन बदली करण्यात आली. यावरून असे दिसून येते की, शासनाला इमानदारीने काम करणारे कर्मचारी नाही पाहिजे. तर जे कर्मचारी चोरांचे साथीदार असतात असे कर्मचारी शासनाला पाहिजे असे यावरून स्पष्ट दिसून येते आहे. हा आदेश वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी तात्काळ मागे घेऊन अश्या कर्तव्यदक्ष व कर्तबगार अधिकाऱयांना जुन्याच ठिकाणी खडसंगी येथे कार्यभार द्यावा अशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे...



(तर वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना माहिती)..

ज्या वनविकास महामंडळच्या परिमंडळ अधिकाऱ्यावर वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना बोलावून अवैध साग तोड झाल्याची माहिती दिली असल्याचा ठपका ठेऊन वनकर्मचार्याची बदली केली. त्या वनकर्मचाऱयांना वृत्त पत्राच्या प्रतिनिधींना बोलावले नसून, अवैध साग तोडची गुप्त माहिती वृत्त पत्राच्या प्रतिनिधींना माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी वृत्ताकना करिता गेले असता त्या ठिकाणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित असून, त्यांनी या अवैध साग तोडची माहिती दिली. हे सर्व प्रकरण निरपराध असून, वनविकास महामंडळचे वनपरिमंडळ अधिकारी रमेश बलैया यांचा बदली आदेश तात्काळ मागे घ्यावा व अश्या कर्तबगार कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना  खडसंगी क्षेत्रातच कार्यभार दयावा अशी मागणी चिमूर तालुक्यात व परिसरात जोर धरत आहे.

तर अवैध कामाची माहिती देणे चुकीचे आहे काय?
पत्रकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ समजल्या जातोय मग अवैद्य जिथे काम होत असेल आणि ते प्रकरण वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापुढे नागरिकापुढे आणत असतील तर ते चुकीचे काय? अवैध होत असलेले काम पत्रकारांनी पुढे आणू नये असे वनविभाग म्हणत असेल आणि एखाद्या कर्मचार्यावर अवैध कामाची माहिती माध्यमांना दिले असा ठपका ठेऊन त्या कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई करून बदली करीत असतील तर ते नियमबाह्य आहे असे वाटते काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!