अज्ञात वाहानाच्या धडकेत नेरी येथील इसमाचा जागीच मृत्यु
नेरी - जांभुळघाट रोडवरील घटना
तालुका प्रतिनिधी - ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - दिनांक.१०/०६/२०२० चिमूर पोलीस स्टेशन च्या हद्धितील नेरी- जांभुळघाट रोडवर रामपुरी हूळकी जवळ आज सकाळी ०९:३० ते १०:०० वाजताच्या सुमारास अज्ञान वाहानाने धडक दिल्याने अनिल कामडी वय ४० वर्षीय इसम दुचाकी क्र.एम.एच.३४,एस.७०१४ असुन मृतक नेरी येथील रहवासी आहे.घटनेची माहीती नेरी पोलीस चौकीला मिळताच घटनास्थळी पोलीसानी पोहचून पंचनामा करून मृतकाच्या शवाला शववीच्छेनासाठी उपजिल्हा रूग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले.पुढील तपास चिमुर पोलीस स्टेशन चे ए.पि.आय.खैरकर करीत आहे. हि जी घटना घडली होती तेव्हा लगेच पोलीसांची गाडी घटनास्थळी आली होती.ती भिसी पोलीस स्टेशन ची असल्याची कळते हि सगळी घटना बघुन शुध्दा कोणत्याही प्रकारचे सहकार्य या पोलिसांनी केले नाही. व थांबले शुध्दा नाही.याच पोलीस स्टेशन अंर्तगत शंकरपुर येथे आठ दिवसा अगोदर आपल्या जिवाची पर्वा न करता विहीरीत उडी मारून दोन जीव वाचवीण्यात त्या शिपाई ला यश अाले.सर्वच क्षेत्रात त्यांचे कौतुक करण्यात अाले.हा आहे मानुसकी चा फरक कर्तव्य बजवताना मनाची ईच्छा शुध्दा अावश्यक असते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!