विद्युत तारावरील झाडाने अपघाताचा धोका
पवनपार येथील विद्युत तारावरील झाडाने व विद्युत तारा ढिल्या झाल्यानेअपघाताचा धोका
वा-याच्या हलक्या झोक्यान् विद्युत पुरवठा खंडीत
विद्युत विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही प्रतीनिधी)
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील विद्युत तारा ढिल्या झाल्याने व विद्युत तारावर झाडे झुडपे आल्याने सतत स्पार्किंग होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असुन विद्युत तारा टाईट करण्यात यावे व विद्युत तारावरील झाडा झुडूपाचे अतीक्रमन काढण्यात यावे अशी मागनी नागरीकांनी केली आहे.
पवनपार येथील विद्युत तारा अनेक दिवसापासुन असल्याने जुन्या तारा ढिल्या झालेल्या आहेत. विद्युत तारा ढिल्या झाल्याने सतत स्पार्किंग होत असते. त्या स्पार्किंगमुळे ठिणग्या व अग्ऩीचे झुंडच्या झुंड निर्माण होत असतात. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावरून चालने भितीचे झाले आहे. कधी काय होईल याचा नेम उरलेला नाही.
विद्युत तारा ढिल्या तर झाल्याच परंतु गावातील विद्युत तारावर झाडे झुडपेही आलेली आहेत. त्यामुळे थोडी जरी हवा आली तर विद्युत तारा एकमेकाला घासुन अग्नीच निर्माण होते व ठिनग्याच पडतात त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पवनपार येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आतातर पावसाचे दिवस आले आहेत. वादळ वा-यासमवेत पाऊस येत असते. त्यावेळी तर पवनपारकरांना अंधारातच जिवन जगावे लागते. पवनपार येथील विद्युत कधी दिवसा तर कधी रात्री जात असल्याने पवनपारकरांच्या नशिबी अधारच लिहिला आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील नागरीकांनी याबाबत अनेकदा तक्रार करून सुद्धा याकडे दुरलक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांकडुन केल्या जात आहे
पवनपार येथील विद्युत दिवे भरदिवसाही सुरू असतात. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली असली तरी याबाबत संबंधीत विभाग गाभीर्याने घेत नसल्याचे नागरीकाकडुन सांगण्यात येत आहे.
अपघात झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीवर त्याचा परीणाम पडल्यानंतर संबंधीत विभाग याकडे लक्ष देईल का असा आरोप पवनपार येथील उपसरपंच संदीप गुरूनुले यानी केला आहेदरम्याण या समस्या कडे संबंधीत विभागाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागनी पवनपार येथील उपसरपंच संदीप गुरूनुले समवेत नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!