तळोधी येथे आढळला पहिला कोरोना पॉझिटिव




तळोधी (यश कायरकर)
तळोधी येथील 36 वर्षीय युवा कोरोना बाधित आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आज जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव वरून आलेला हा युवक कोरोना पॉझिटिव निघालेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी दिनांक ७ जून रोजी एकाच दिवशी ११ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ३९ झाली आहे.

जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३६ वर्षाचा व्यक्ती आहे.
नागभीड तालुक्यात एकुण चार पाझीटिव्ह झाले आहेत.             तळोधी क्षेत्रातच ओडिसा वरून वैजापूर येथे आलेला ४० वर्षीय पुरुष पाझीटिव्ह निघालेला आहे. *विषेश म्हणजे वैजापूर बद्दल विश्र्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णा सोबतच पुन्हा ७ व्यक्ती एकत्र प्रवास करत आले आहेत. मात्र फक्त दोनच दिवस त्यांना ग्रामपंचायत मध्ये कोरंटाईन ठेवण्यात आले. कोणतेही लक्षण दिसत नसल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. व नंतर ते बाहेर फिरत असल्याचे सांगितले आहे. आता या सर्वांना परत ग्रामपंचायतीमध्ये आणल्याची माहिती आहे.
एक यवतमाळ वरुन पुनघाळा रिठ येथील आलेला ३६ वर्षिय व्यक्ती व यवतमाळ येथून आलेला नागभीड शहरातील ४६ वर्षाचा पुरुष असे पाझीटिव्ह आलेले आहेत.
 




1 टिप्पणी:

झिंदाबाद!