गर्भवती महिलेचे मृत्यूप्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल
गर्भवती महिलेचे मृत्यूप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
सावली (प्रतिनिधी)
सावली तालुक्यातील कसरगाव या गावात गर्भवती महीलेचा झालेल्या संशयास्पद मृत्यूची दखल पाथरी पोलिसांनी घेतली असून मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या इन कॅमेरा बयानाच्या आधारे मृतक महिलेचा पतीसह पाच जणांच्या विरोधात पाथरी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सावली तालुक्यातील लोभीना भोयर ही महिला बेपत्ता होती. मात्र याबाबतची कोणतीही सूचना तिच्या पतीने लोभीनाच्या माहेरी दिली नव्हती. ही माहिती दुसरीकडून मिळाल्यानंतर लोभिनाचे माहेरील मंडळी कसरगाव येथे आले. मात्र शोधाशोध करताना शेतातील विहिरीत लोभीनाचा मृत्यूदेहच तिच्या पतीला आढळला.
लोभीना सात महिन्याची गर्भवती होती. तिच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते. त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद असतानाही ही बाब पोलिसांना न सांगता सासरच्या मंडळींनी परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मूलचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पाथरीचे ठाणेदार घारे यांनी जिबगाला जाऊन लोभीनाच्या माहेरच्या नातेवाइकांशी चर्चा केली आणि पाथरी येथे लोभीनाच्या नातेवाईकांची इं कॅमेरा बयान घेऊन आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे आणि पोलिस तपास करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!