कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर
मूल (कुमुदिनी भोयर)
अत्यावश्यक असलेल्या अशा महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला आपल्या मागणीची पुन्हा एकदा आठवण करून देत संप पुकारला आहे. मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात सर्व कंत्राटदार कर्मचाऱ्यानी कामावर न आल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे.
कोविड- 19 चा महामारीचा प्रादुर्भावाने सध्या चंद्रपूर जिल्हात थैमान घालत असून मूल तालुक्यात आतापर्यंत 3 रुग्णांची नोंद झालेली आहे. तसेच पावसाळा तोंडावर असल्याने हिवताप मरेरिया सारख्या साथीचे रोगांमुळे आरोग्य विभाग सज्ज असायला पाहिजे. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करुन सरकार ला योग्य वेळी मोठा झटका दिला आहे. आरोग्य विभागाचे कंत्राटदार कर्मचारी हे गेल्या 10 ते 12 वर्षा पासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. विभागात बरेच रिक्त जागा असूनही यांना गेल्या पाच ते सहा वर्षा पासून स्थायी करण्यासाठी शासनाकडून फक्त आश्वासन दिले जात आहेत. मात्र अजून पर्यंत त्यांना स्थायी न केल्यामुळे यांनी काम बंद आंदोलन केलेले आहे. जिल्ह्यात संचार बंदी कायदा लागू असल्याने निदर्शने, नारे बाजी न करता आरोग्य विभागाच्या सर्व कंत्राटदार कर्मचाऱ्यांचे संघटनेच्या वतीने मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुद्दत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!