वटसावित्री विशेष #vatsavitri

पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्री
महिला करतात वटपूजा

पुर्विपासुन आलेली परंपरा आजतागायत सुरू


जितेंद्र पेंदाम
पवनपार ता सिंदेवाही जिल्हा चंद्रपुर
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया जेष्ट पोर्णीमेच्या दिवशी वट पुजा करतात.पती कसाही असला तरी ते पतीच असता पतीची जागा कुनीही घेवु शकत नाही.पती हा स्त्रियांच्या जिवनातील अविभाज्य घटक.त्याशिवाय स्त्रीयांचं जिवन अपुर्ण.आणि म्हनुन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वटपुजा करून प्रार्थना करतात.
या दिवशी सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आनली .त्याची आख्यायीका अशी.
मद्र देशात अश्वपती एक राजा होता. सावित्री नावाची एकुलती एक नावाची कन्या होती.राजाच्या सांगण्यावरून तिने स्वत:ला आवडलेल्या सत्यवान नामक एका राजपूत्राराशि विवाह केला .सत्यवानाचा पिता द्युमत्सेन हा आंधळा होता.पुढे राज्य गेल्यामुळे तो आपल्या परीवारासह अरण्यात राहू लागला.
सत्यवान शूर व रूपवान असलातरी अल्पायुषी होता. हे नारदाला माहीत होते. नारदमुनीनी वारंवार सांगुन ही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला.
जेष्ट पोरणिमेच्या दिवशी सत्यवानाचा मृत्यु होईल , असे नारदांनी सांगितले होते.त्या आधी तीन दिवस तिने उपवास केला होता. देवाची प्रार्थना केली होती. सत्यवानाचा जवळ राहीली. पोर्णिमेच्या दिवशी दिनचर्या प्रमाने सत्यवान रोजच्या कामाला लागलेला होता. नारदमुनीच्या भविष्याने सावित्री ही त्याच्या पाठोपाठ जात होती. सत्यवान जंगलातुन येवुन सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवुन झोपला .त्याचवेळी सत्यवानाचा प्राण हरण झाले.
ते पाहुन सावित्री त्याच्या पाठोपाठ जावु लागली . यमाने तिला समजावन्याचा प्रयत्न केला. पण सावित्रीने ऐकलं नाही. सावित्री ही पतीव्रता असल्याने अखेर प्राण परत केले.
वटवृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत आनल्याने म्हणून जेष्ट पोर्णिमेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वटपूजा करतात व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून देवाची प्रार्थना करतात.
काहीही असलं तरी चालत आलेली परंपरा आजतागायत सुरू आहे. हे विशेष.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!