नगर प्रशासनाची मनमानी

अजूनही मूल वार्ड नं. १४ मध्ये पक्क्या नाल्या व रस्ता नाही
मूल (प्रतिनिधी) :
येथील वार्ड क्र. १४ मध्ये रस्ते व नालीचे काम न झाल्याने नगर प्रशासन बाबत जनतेचे आक्रोश निर्माण होत आहे. एकीकडेे जनता कोरोना वायरस च्या प्रकोपामुळे त्रस्त आहेत. अश्यातच स्थानिक राजकारणातील हेवेदावे यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
प्रभाग क्र. 6 वार्ड नंबर १४ हे नव्याने प्रगत होत असलेले हे लेआऊट आहेत पाच ते सात वर्षापासून येथे लोकवस्ती वाढत आहे, मात्र नगर प्रशासनाच्या गलथानपणामुळे व स्थानिक राजकारणामुळे या भागात पक्क्या नाल्या नाही, रस्ते नाही. दर पावसाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत स्थानिक राजकारणी, नगर प्रशासन, बांधकाम विभागाचे अधिकारी यांचेकडे येथील रहिवासी निवेदन देऊन समस्यांचे निराकरण करण्याची विनंती करण्यात आली, परंतु अधिकाऱ्यांनी कानडोळा करीत टोलवाटोलवी चे उत्तर देऊन येथील नागरिकांना रस्त्याच्या व सांडपान्याकरिता नालीच्या सुविधेपासून हेतुपुरस्पर वंचित ठेवणाचा हेतू चालविला असल्याचे येथील रहिवाश्याचे मत आहे.
बरेचदा लहान मुलांना शाळेत सोडून देत असताना बऱ्याच महिला भगिनी गाडी होऊन चिखलात पडल्याचे तोंडी लोकप्रतिनिधीना सांगण्यात आले, मात्र कोणाचेही या समस्यांकडे लक्ष नाही. पावसाळ्यात साचून असलेल्या पाण्यामुळे विविध रोगांचे डासांचा प्रादुर्भाव निर्माण होऊन येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
सध्या कोरोना वायरस सारख्या आजाराला तोंड देने सुरू आहे. सदर समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही तर जनआंदोलन नाकारता येत नाही असे मत तेथील रहिवाश्यांनी व्यक्त केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!