राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या स्थापना दिवस निमित्य चिमूर शहरात कोरोना च्या किट चे वाटप
१० जून स्थापना दिवस
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.१०/०६/२०२० ला चिमूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा दि. १० जून हा स्थापना दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २१ वर्ष पूर्ण झाले असून देशात कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य आजाराचे संकट कोसळले असून स्थापना दिवस थाटा माटात साजरा न करता केवळ आरोग्य विभागातील कोरोना वॉरीयर्सना सुरक्षा किट चे वाटप व रक्तदान शिबीर घेण्याचे उपक्रम संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी अवलंबिले असल्याने त्यांच्या सूचनांचे पालन करून चिमूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने दि.१० जून या स्थापना दिना निमित्य उपजिल्हा रुग्णालय चिमूर व खाजगी रुग्णालयात कोरोना कोविड - १९ ची सुरक्षा किट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आली.यावेळी उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे अधिक्षक डॉ. गो.वा.भगत ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष योगेश ठुने, राजू मुरकुटे, जावेद पठाण रामटेके रामदास ठुसे आदी उपस्थित होते. या दरम्यान समाधान रुग्णालयात डॉ.बोढे तसेच डॉ.बोरकर यांच्या खाजगी रुग्णालयात सुरक्षा किट वाटप करण्यात आल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!