अरविंद बन्सोड व विराज जगताप या दोन्ही प्रकरणाची न्यायालयीन कमिटी गठित करून सी. बी आय. चौकशी करावी - शुभम मंडपे यांची मागणी



सम्यक विदयार्थी आंदोलन यांचेकडून चिमुरात जाहिर निषेध

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना निवेदन

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक.१५/०६/२०२०
नागपुर येथील नरखेड तालुक्यातील पिंपळधारा गावातील उच्च शिक्षित व समाज कार्यात अग्रेसर असणारे अरविंद बन्सोड वय ३२ वर्ष यांना मारहाण केल्यामुळे २७ मे २०२० रोजी मृत्यु झाला व तसेच पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील विराज भालचंद्र जगताप वय २० वर्ष यांची आंतरजातीय प्रेम संबंधातून दि.६ जुन २०२० रोजी अज्ञात स्थळी बोलवुन हत्त्या करण्यात आली.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या व फुले, शाहु, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जातीय वादातून हत्त्या होणे हे महाराष्ट्रात काय भारतात उचित नाही. ह्या दोन्ही प्रकरणाचा निषेध चिमुर मध्ये सम्यक विध्यार्थी आंदोलन शाखा चिमुर च्या वतीने करण्यात आला व  उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले व ह्या दोन्ही प्रकरणातील जातीयवादी हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे  व ह्या दोन्ही प्रकरणाची न्यायालयीन कमिटी गठीत करून  सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी अशी मागणी सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली, व यावेळी निवेदन देतांना सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी संगर्षं मेश्राम व निलेश गावंडे उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!