सिंदेवाही पाथरी रोडवर दुचाकींचा भीषण अपघात

मूल (प्रतिनिधी) :
सिंदेवाही पाथरी रोडवर तीन दुचाकी धडकेने साय. 5.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला. त्यात पाच जण जखमी झाले. या अपघातातील जखमी, मूल तालुक्यातील मारोडा व सिंदेवाही तालुक्यातील पवना या गावचे आहेत.  जखमींना मार लागल्याने ते रोडवर तडफडत होते पण पोलीस किंवा अम्बुलन्स मात्र अजूनही आली नव्हती.  तिघांच्या पायाला भरपूर मार लागला असून पाय निकामी होण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती कळताच मरेगाव, धानोरा येथील लोकानी गर्दी केली. या घटनेने गावात खळबळ माजली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!