बिबट मृत्यूप्रकरणी १९ आरोपींना घेतले ताब्यात
बिबट मृत्यूप्रकरणी १९ आरोपींना घेतले ताब्यात
सावली (विशाल नर्मलवार)
वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपक्षेत्र बीटातील कक्ष क्र १५३४ अंतर्गत साखरी माल येथे डुक्करांची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी वनविभागाने १९ जणांना ताब्यात घेतले आहे.
भोजराज ठाकूर, सुखदेव बांबोळे , आकाश कुमरे, नरेश भोयर , सावजी उराडे , सिरू गेडाम, दशरथ गेडाम, नकटू ठाकूर, विवेक आवळे , रमेश भोयर, राजू भोयर, प्रमोद भोयर, किशोर ठाकूर, सत्यवान गेडाम, वेला बांबोळे, तुळशीराम भोयर, भाऊजी भोयर, किशोर भोयर आणि पुरुषोत्तम सोयाम अशी आरोपींची नावे आहेत. तर एका आरोपिचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.
शेताची नासधुस करत असलेल्या डुकरांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता सापळा सुरु केला आहे. अशाप्रकारचे रानडुकरांची शिकार करण्यासाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यात साडेतिन वर्षीय बिबट अडकून काल १० जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्युमुखी पडला. करून आरोपींना ताब्यात घेतले असून या सर्व आरोपीविरुद्ध वाइल्डलाइफ प्रोटेक्शन कायदा १९७२ चे कलम २,९,३९ आणि ५१ लावण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!