खळबळजनक घटना चंद्रपूर मध्ये पुन्हा ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद



चंद्रपूर जिल्हातील कोरोना बाधीताची संख्या पोहचली ४२ वर 

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.१०/०६/२०२० चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री आणखी ३ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे. नवीन ३ रुग्ण  कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह ठरले.व
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील ४३ वर्षीय एका कोरोना बाधित रुग्णाची ३३ वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला. या कोरोना बाधितांना चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले.अन्य १ कोरोना बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ला ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) आणि ९ जून ( एकूण ३ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४२ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टीव्ह कोरोना बाधीतांची संख्या आता १९ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!