घोडाझरी अभयारण्यात नियमांची पायमल्ली
घोडाझरी अभयारण्यात नियमांची पायमल्ली
(प्रतिनिधी मूल)
अभयारण्य,पर्यटन स्थळे, कोरोना (Covid -19) च्या महामारी च्या प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बंद करून दिली आहे. मानवी हस्तक्षेप कमी झालेला आहे. त्यामुळे वन्यजीव अभयारण्यात,अभयारण्यातील रस्त्यांवर बिंधास्तपने विचरन करीत आहेत. मात्र आपल्या घोडाझरी अभयारण्यात उलटे चित्र दिसून येत आहे. घोडाझरी मुख्य गेटवर 'प्रवेश बंद' असे बँनर जरी लावले असले तरीही लग्नाच्या समारंभात उपस्थिती च्या नावाने,रेस्टॉरंट च्या नावाने रात्रंदिन या अभयारण्यातुनच लोकांची ये-जा सुरुच आहे.
घोडाझरी गाव व घोडाझरी रेस्टॉरंट जरी अभयारण्यात असेल तरीही या दोन्ही ठिकाणी दळनवळना करिता अभयारण्या बहेरुनही सुरक्षित पक्का डांबरी रस्ता आहे . मात्र अभयारण्याची, अभयारण्य प्रवासाची, प्राणी दर्शनाची मजा उपभोगन्या करीता मुद्दाम काही महाभाग कधी कधी रात्रीच्या वेळी ही ये जा करतात. आणि रात्रीचे प्रवेश बंदी असलेल्या नियमांची खिल्ली च उडवितांना दिसून येत आहेत. यात नागभीडकर जास्तच अग्रेसर असल्याचे दिसुन येत आहे. तरीही घोडाझरी या गावात, व घोडाझरी रेस्टॉरंट मध्ये दळनवळन करणे करीता अभयारण्य बाहेरून किटाळी(बो.)-हुमा-खळकी याच रस्त्याचा वापर करन्यात यावा.
याकडे संबंधित वनविभागाने, व पर्यावरण संरक्षण विभागाने लक्ष द्यावे असी वन्यजीव पर्यावरण प्रेमींची मागणी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!