सावली पंचायत समितीत घरकुल लाभार्थ्यांची लूट
सावली पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांची लूट
सावली (प्रतिनिधी)
शासनाने गरिबांना गक्काचा निवारा मिळावा या उदात्त हेतूने एस. सी. प्रवर्गासाठी रमाई घरकुल, एस. टी. प्रवर्गासाठी शबरी घरकुल, तर इतर सर्व प्रवर्गासाठी पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित करुन सन २०२२ पर्यंत देशातील घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे दृष्टीने पावले उचलली. व त्या माध्यमातून सन २०१९-२०, २०२० -२१ या वित्तीय वर्षात मोठ्याप्रमाणावर सर्व प्रवर्गातील गरजू लाभार्थ्याना घरकुल मंजूर केले. अशातच घरकुल मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यानी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण केले असता शासनाने लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात पहिला अनुदान जमा केले व लाभार्थ्यानी घरकुल बांधकाम सुरु केले. पायवा लेवल दुसरा बिल, सज्या लेवलवर तिसरा बिल व संपूर्ण काम झाल्यावर उर्वरित संपूर्ण बिल अदा करायची आहे. व त्याप्रमाणे लाभार्थी पंचायत समितीकडे निधीची मागणी केले असतांना मात्र लाभार्थ्यांकडून बिल काढण्याकरिता प्रत्त्येक बिलाला घरकुल विभागाचे तांत्रिक यांचेकडून ५०० ते १००० रुपयापर्यंत मागणी केली जाते व ज्यानी पैसे नाही दिले त्यांचे बिल अडवून त्या लाभार्थ्याना नाहक त्रास दिला जातो. एवढा गंभीर प्रकार कार्यालयात घडत असताना मात्र पंचायत समिती प्रशासन तथा लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व प्रकाराने आंधळा दळतय आणी कुत्रा पिठ खातोय असेच चित्र पंचायत समिती सावली येथे पाहायला मिळत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!