चोर बीटी प्रकरणात शेतकऱ्यावर गुन्हा दाखल



विहिरगाव(वार्ताहर)
सावली तालुक्यातील बोरमाळा येथील एका शेतकऱ्यावर चोर बीटी वापरण्याच्या प्रकरणात पाथरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कृषी विभागच्या भरारी पथकाने धाड टाकली असता बोरमाळा येथील शेतकरी डीडीराम काशीनाथ लाकडे यांचा कडे ४५० ग्रॅमचे ६ बीटी बियाणे अवैध आढळून आले. ते जप्त करण्यात आलेले असून या प्रकारणाची अधिकाऱ्यांनी पाथरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेले असून शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती आहे. सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणांत चोर बीटी चा वापर शेतकरी करीत आहे. त्या सर्वांवर कृषी विभागाची नजर असुन हे बियाणे वापरू नका असे आव्हान कृषी विभाग करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!