चिमूर नगर परिषदेने २ हॉटेल मालकांवर केली कारवाही



हॉटेल ग्रीन लँड व श्री बालाजी रेस्टॉरंट अँड हॉटेल

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : -  दिनांक.१६ जून २०२० संपूर्ण विश्वात कोरोना कोविड - १९ संसर्गजन्य रोगाची साथ सुरु असंतांना व संचार बंदी कलम १४४ सुरू असतांना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी २२ मार्च २०२० पासून चंद्रपूर जिल्ह्यात लॉक डाऊन ची परिस्थिती सक्ती करण्यात आली. यामध्ये पान ठेले पुर्णतः बंद , हॉटेल्स करीता फक्त किचन सुरू व पार्सल सुविधा रात्री ०९:०० वाजेपर्यंत , सलून स्पा दुकाने पुर्णतः बंद व जीवनावश्यक वस्तुंची विक्री सुरू असे असतांना ०९:४३ मिनिटे झाली असतांना सुध्दा हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्स न पळता टेबलवर जेवण वाढणे सुरु होते याबाबत चिमूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली व त्याच क्षणी चिमूर येथील नेहरु शाळे समोरील श्री बालाजी रेस्टॉरंट हॉटेल भोजनालय व लॉज मध्ये किचन शिवाय टेबल लावून जेवणाची परवानगी नसतांना आणि शासकिय परवानगी नसतांना कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल चिमूर नगर परिषदेने मोठी कारवाही केली.
या हॉटेलमध्ये नामांकित मासळ मदनापूर सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके सुद्धा कायदयाचे उल्लंघन करून जेवण करीत होते.यावेळी २० ते ३० लोकांच्या वर जेवण करणाऱ्यांची संख्या होती. त्याचबरोबर हॉटेल ग्रीन लँड वर सुद्धा कारवाही करण्यात आली.हि कारवाही फक्त नगर परिषद चिमूर मार्फत हॉटेलवरच का ? सुगंधित तंबाखू विक्री च्या दुकांदारांवर का नाही ? नियम सर्वांना सारखे असायला हवे अशी चर्चा चौका - चौकात रंगली आहे. आणि असे असतांना लोकप्रतिनिधी जेव्हा कायदा व सुव्यवस्थेचे भंग करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाही करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!