ब्रम्हपुरीत ठरली, लॉकडाऊनमध्ये अवैदय दारू विक्रीची रणनिती


ब्रम्हपुरीत ठरली, लॉकडाऊनमध्ये अवैदय दारू विक्रीची रणनिती


ब्रम्हपुरी (प्रतिनिधी)दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्हयात अवैदय दारू विक्रेत्यांना राजकीय पाठबळ देत, ब्रम्हपुरीत यासाठी एक गुप्त बैठक  या व्यवसायातील प्रमुख तस्करांनी घेतल्यांची विश्वसनीय माहीती आहे.

जिल्हयात दारूबंदी लागू झाल्यानंतर, या दारूबंदीची खरी अमंलबजावणी कोरोणाच्या लॉकडाऊन काळात अनुभवल्या गेली.  राज्यात इतरत्र दारू दुकाने बंद असल्यांने, चंद्रपूर जिल्हयात दारू तस्करी करण्यात अडचणी निर्माण झाल्या, मात्र राज्यात दारू विक्रीला परवाणगी मिळताच, चंद्रपूर जिल्हयातील अवैदय दारू तस्कर सक्रिय झाले आणि त्यांनी एक ब्रम्हपुरीत बैठक घेवून, तालुका निहाय दारू कुणी विकायची  याचे नियोजन केले.  याव्यतिरिक्त इतर कुणीही दारू विकू नये यासाठीही खबरदारी घेण्याचे ठरले.  ज्यांना अवैदय दारू विक्री करायची आहे, त्यांनी या बैठकीत ‘ठरलेल्या तालुका निहाय दारू विक्रेत्यांकडूनच माल घेतला पाहीजे’ असे ठरविण्यात आले.  अधिक दारू विक्रेत्यांकडून चिल्लर चिल्लर हप्ते गोळा करून, राजकीय नेते आणि  पोलिसांसह संबधितांना पोहचविण्यापेक्षा काही मोजक्यांनीच ही जबाबदारी उचलल्यास, तस्करीचा व्यवसाय सुरळीत चालेल असा विचार यावेळी मांडण्यात आला.  या बैठकीत एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबधित दारूविक्रेते अधिक असल्यांचीही माहीती आहे.  यावेळी, त्यांचा नेता, पोलिस आणि इतरांना कसे मॅनेज करायचे ते ठरवतील अशीही माहीती देण्यात आली.  उल्लेखनीय म्हणजे, या बैठकीनंतर, लॉकडाऊनच्या काळातही मोठया प्रमाणावर भंडारा, नागपूर, गोंदिया जिल्हयातून होणाऱ्या दारू तस्करीत वाढ झाली आहे.  जिल्हयात अवैदय दारू मोठया प्रमाणावर आली, हे दारूच्या उतरलेल्या किमंतीवरूनही स्पष्ट झाले आहे. 
कोरोणाच्या काळात पोलिसांनी  जिल्हयाच्या सिमा चारही बाजूने भक्कम बंद केले असतांना, जिल्हयात ट्रकांनी येणारी दारू, ब्रम्हपुरीच्या बैठकीची सत्यता निर्माण करून देत आहे, हे विशेष।!

३ टिप्पण्या:

  1. .tya peksha darubandi uthvili tar changle hoil garib lokanna kami bhavat daru milel garib tar marnar nahi ani he taskar garib hotil

    उत्तर द्याहटवा
  2. दारूबंदी ने काही साध्य होणार नाही. त्याकरीता शासनाने चंद्रपूर, गडचोरोली व वर्ध्याची पण दारू सुरू करावयास हवी. म्हणजे असे भ्रष्टाचार होणार नाही....

    उत्तर द्याहटवा
  3. चन्द्रपुर,गडचिरोली जिल्ह्यात अवैद्य दारू तस्कर निर्माण होण्यापेक्षा दारू बंदी उठलेली बरी

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!