महिमा कवी कालीदासाची

महिमा कवी कालीदासाची

कालिदास सांगून गेले,
अवगुण छोटा वा मोठा।
व्यक्तीला संपवून टाकतो ,
चांगल्या सवयीचा तोटा । ।

कोणतेही काम करा,
ज्यात परिश्रम आहे खरा । 
त्याच्या थकवा राहत नाही,
जर परिणाम होतो बरा । ।
 
सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी,
सूर्याची लाली दिसते खरी। 
महान व्यक्ती सुखदुःखातही,
एकसारखी  राहते बरी। । 

दगडांच्या तुकड्यांना समजतो,
अज्ञानी हा रत्न खरा। 
पृथ्वीचे अन्नश, पाणी, सुवचन ,
हे तीन रत्ने न कळे त्याला। । 

वस्तू जूनी असल्यावर ती,
वाईट होईल असं नाही। 
माणसाच्या उत्तम गुणाने, 
त्याची किंमत कमी नाही। । 

सत्य आणि धैर्यवान पुरूष, 
आपली ओळख ठरवितो। 
कठिण समयी साहस धैर्याने, 
आपले काम तो करितो। । 

दान पुण्य केल्याने मिळते, 
सुखी समृद्धी पर लोके। 
माता पित्याच्या सेवेने मिळते, 
परम् सुख दोन्ही लोके। । 

बिन स्वार्थाने सूर्य ही आपला, 
प्रकाश सर्वाना देतो। 
सज्जन पुरूषही दुसऱ्याच्या, मदतीला धाऊन येतो.। । 
_________________________

महेन्द्र सोनेवाने, "यशोमन"
गोंदिया
मो. 9421802067

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!