जांभुळघाट येथील आदिवासी सोसायटी अजुनही कर्ज वाटपाच्या प्रतीक्षेत
बँक निरिक्षकांनी रजा घेऊन मार्ली दांडी
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालूक्यातील जांभुळघाट येथील आदिवासी सोसाटी द्वारे आता पर्यंत कर्ज वाटप करण्यात अाले नाही.चिमुर तालुक्यातील संपुर्ण आदिवासी सोसायट्या मार्फत कर्ज वाटप करण्यात आले पण जांभुळघाट येथील अादिवासी सोसाटी कर्ज वाटप करण्यास टाळा-टाळ करीत अाहे.बँक कर्मचारी ९९ चालू ( रनिंग ) शेतकरी कर्जा साठी दरोज चकरा मारीत आहे.सर्व प्रकारचे पाठपुरावे करून शुद्धा को - ऑप्रेटीव्ह बँक शंकरपुर चे कर्मचारी राजु नाकाडे हे दुजाभाव करीत अाहे . चिमुर तालुक्यातील सर्व आदिवासी सोसायट्या वाटप करून बँक निरीक्षक नरेंद्र पराते रजा घेऊन दांडी मारीत आहे .पण शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून दयावी व शेतकऱ्याना तात्काल सोसायटी चे कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी नरेश शेंडे संचालक यांचे कडून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!