मानकापूर येथील निकृष्ट बंधारा बांधकामाची पालकमंत्र्यांनी घेतली दखल. सखोल चौकशीचे अभियंत्यांना आदेश.
बांधकामाचे मॉस काँक्रीटसाठी ४० एमएम तर आर सी सी साठी 20 एम एम गिट्टीचा वापर आहे परंतु जास्तीत जास्त40 एम एम गिट्टीचा वापर करण्यात आलेला आहे, पूर्ण क्रांक्रीट न करता मधोमध माती रेती भरलेल्या बॅगनी क्रांक्रीट पूर्ण करण्यात आलेला आहे. बांधकामासाठी १० फूट खोदकाम पोकलन मशिनद्वारे करण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी जोराचा पाऊस आल्याने खोदकाम जैसे ते झाले त्याच्यावरच बंधाऱ्यांची पायाभरणी करण्यात आली, लोहा 3 फुटाचे तुकडे वापरून अत्यंत कमी वापर करण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांकडून पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना मिळाली होती. पाहणी अंती बंधारा बांधकाम बोगस झाल्याचे आढळल्याने कोरेवार यांनी चौकशीचे निर्देश दिले. उप अभियंता ननावरे, कनिष्ठ अभियंता गंधे यांनी चौकशी केली यादरम्यान निकृष्ट कामास निस्तारण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत हे प्रकरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली. याची दखल घेत मानकापूर व चारगाव येथील बंधाऱ्यांची सखोल चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!