नाभिक समाजाचा 15 जूनला मूक आंदोलन

नाभिक युवा आघाडी च्या वतीने येत्या 15 जूनला लॉकडाऊन मुळे सरकारला जागे होण्यासाठी मुक आंदोलनाचा इशारा
उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्रायांना निवेदन सादर


आवळगांव  (सुरज सुर्यवंशी)
राज्यात कोरोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम नाभिक समाजाच्या दुकानदार बांधवावरती खुप होत आहे 95 टक्के  दुकाने भाड्याने असुन दुकानांचे भाडे रोजचा घरखर्च औषधी खर्च शिक्षण खर्च सामान्य दुकानदार बांधवांना जड झाले आहे त्यात 3 महिने झाले आहेत.  काम बंद जिवन जगने मुश्किल होईल यासाठी सरकारने आम्हा महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज दुकानदार बांधवांनचे मागण्या व  आर्थिक सहाय्यता  करावे सरकार सर्व स्तरांतील समाजला नोकरवर्ग बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गास मदत जाहीर होत आहे तर नाभिक समाजाच्या दुकानदार बांधवावरती अन्याय नको. सलून व्यावसायिकांच्या   मागण्या मान्य झाल्या पाहिजे   सरकारला कळकळीची विनंती आहे.  म्हूणन अस्या परिस्थिती मुळे आम्ही ब्रम्हपुरी नाभिक युवा आघाडी च्या वतीने येत्या 15 जून ला आवळगांव यांच्या सहकार्याने मुक  आंदोलनाचा इशारा करन्यायत  आलेला आहे .
तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाभिक समाजांनी आंदोलने चालू ठेवली आहेत तरी सुद्धा शासनाला जाग येत नाहीं. व नाभिक समाज हा एकत्र असून शासन मदत करायला तयार नाहीं. तरीपण शासनाला इशारा करण्यासाठी हा  मुख आंदोलन करण्यात येतंय.  शासनांनी   याच्या वर विचार न केल्यास  नाभिक समाजाकडून उपासी मारण्यापेक्षा तीव्र आंदोलन करू मारण्यास सोयीस्कर राहील. असा इशारा नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी व आवळगांव च्या वतीने केला जात आहे.
      निवेदन देताना  पितांबर फुलबांधे. नाभिक युवा आघाडी चे अध्यक्ष विलास सूर्यवंशी, सहसचिव गोलू फुलबांधे, ,अजय खळसिंगे, सुरज सुर्यवंशी, संतोष पोहनकर,कुसुमाकर लांजेवार, दिवाकर लांजेवार नाभिक युवा आघाडी चे प्रसिद्धी प्रमुख मयुर मेश्राम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!