विद्यार्थ्याला पोलीस उपनिरीक्षकाकडून मारहाण
स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या युवकाच्या घरी जावून विनाकारण मारहाण
मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरीषक व पोलिस शिपायावर कारवाई करण्याची कुंटुंबियाकडून मागणीः
तळोधी बा.
यश कायरकर
तळोधी (बा.) पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नांदेड येथील स्पर्धा परीक्षा तयारी करीत असलेल्या युवकाच्या घरी जावून त्या युवकाविरोधात कुठल्याही प्रकारचे तक्रारी नसताना झोपलेल्या अवस्थेत असलेल्या परमेश्वर डोमाजी मडावी या युवकाला उठवून अंगणात आई-वडीलासमोर बेदम मारहाण करण्यात आली.व त्याच्या हातापायाला दुखापत झाल्याने उपचाराकरीता चंद्रपूर हलविण्यात आले असून मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक साखरे व शिपायावर कारवाई करुन निलबंन करण्याची मागणी आईवडीलानी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,१६ मे शनिवारला तळोधी (बा) पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक आकाश साखरे व पोलिस हवालदार भाष्कर पिसे, सतिश नेवारे हे तिघांनी दुपारच्या दरम्यान परमेश्वर डोमाजी मडावी या युवकाच्या घरी जावून झोपलेल्या अवस्थेत असलेल्या युवकाला उठवून त्याला विनाकारण कुठल्याही प्रकारचा दोष नसताना बेदम मारहाण आई वडिलासमोर करण्यात आली.वडील डोमाजी मडावी याने माझ्या मुलाने काय गुन्हा केला व त्याला कशाला मारहाण करता असा पोलीसाना म्हणाले असता तुम्ही बाजूला व्हावा असे म्हणून जनावरं सारखे लाथाबुक्यानी मारहाण केल्याने त्याच्या हातापायाला जबर मार असल्याने त्याला गाडीत बसवण्यात आले. तसेच नांदेड येथील अक्षय बांबोळे, भुषण केवळराम खोब्रागडे या युवकाना सुध्दा शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. परमेश्वर मडावी या युवकाला हाताला व पाठीला बेदम मारहाण केल्याने त्याला तळोधी पोलिस यांनी खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी नेले होते. मात्र ते घरी आल्यावर त्याची तब्बेत बिघडल्याने उपचाराकरीता चंद्रपूर येथील ग्रामीण रुगणालयात नेण्यात आले. मात्र तळोधी पोलिस कडून विनाकारण बेदम मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरिक्षकावर कारवाई करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक व पालक मंत्री याना निवेदन देण्यात आले. असून यांचा वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलांच्या आई-वडीलानी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!