चंद्रपुरातील पहिला पाॅझिटीव्ह कोरोनामुक्त
चंद्रपूर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची 16 व 17 मे रोजी कोरोनासंदर्भातील दोन्ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. चंद्रपूर शहरातील कृष्णनगर परिसरात हा रुग्ण 1 मे रोजीच्या स्वॅब तपासणीत पॉझिटिव्ह ठरला होता. सध्या हा रुग्ण नागपूर येथे कोवीडशिवाय अन्य आजारासाठी वैद्यकीय उपचार घेत आहे. हा रुग्ण आता कोरोना मुक्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!