मूल शहरात मिठाची कृत्रिम टंचाई
मुल (अमित राऊत)
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मिठाची टंचाई मूल शहरात पसरल्याने ग्राहकांनी दुकानात एकच गर्दी केल्याची दिसून आली. मीठ मिळेल की नाही याकरिता दुकानासमोर ग्राहकांनी रांग लावली होती. मूल तालुक्यातील इतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा मिठाची टंचाई असल्याची चर्चा पसरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानांमध्ये सुद्धा लोकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी केल्यामुळे तेथील दुकानदार शहरांमध्ये येऊन मिठाची बॅग घेऊन जात होते.
मीठ टंचाईची अफवा पसरल्यामुळे शहरातील दुकानदार सुद्धा आधी पेक्षा जास्त किमतीने मिठाची बॅग विकल्या जात असल्याची चर्चा आहे.
प्रशासनाने हे अफवा असल्याचे सांगितले असले तरी मिठाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. ग्राहकांनी गर्दी करु नये असे दुकानदार सर्च टिव्ही शी बोलताना सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!