मूल येथे जनधन खाते काढण्यासाठी महिलांची तोबा गर्दी

मूल येथे जनधन खाते काढण्यासाठी महिलांची तोबा गर्दी
सोशल डिस्टनिंगचा फज्जा


(अमित राऊत, मूल)
मूल येथे जनधन योजनेचे खाते खोलण्यासाठी महिलांनी एकच झुंबड केल्याने सोशल डिस्टन्स सिगचा फजा उडाला आहे. या महिलांना पांगविण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ही घटना आज बारा वाजताचे दरम्यान चेपुरवार कॉम्प्लेक्सच्या परिसरात घडली. उल्लेखनीय म्हणजे समोरच उपविभागीय पोलीस अधिकारीचे कार्यालय आहे.
केंद्र शासनाने जनधन योजनेअंतर्गत महिलांना त्यांचे खात्यात पाचशे रुपयाचे अनुदान जमा केले. यामुळे मूल शहरातील जनधन खाते नसलेल्या शेकडो महिलांनी शारदा काँप्यूटर येथे एकच गर्दी केली, आणि खळबळ उडाली. ही गर्दी वाढतच असल्याचे पाहून प्रशासनाला माहित होताच नगरपालिकेच्या चमूला पाठवून गर्दी पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला तिथून जायला तयार झाल्या नाही, अखेर शारदा कॅम्पुटरचे दुकानदार दुकान बंद करून गेले तरी महिला मात्र तिथेच बराच वेळ ठाण मांडून बसल्या.


एकाच वेळी एवढ्या महिला अचानक खाते सुरु करण्यासाठी कशा आल्या यांना निरोप कोणी दिला, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून चौकशीची मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!