आरमोरीत मिठाची टंचाई असल्याची अफवा



आरमोरी (प्रतिनिधी)
आरमोरी शहरात अचानक मीठाचा साठा संपत असल्याचे आणि मिठाची टंचाई होणार असल्याची अफवा पसरल्याने सर्व दुकानातून मीठ हातोहात खपले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लाॅकडाऊन आहे संचारबंदी आहे. मात्र गडचिरोली जिल्हावासियांना ह्या लाॅकडाऊन पासून सुटका मिळाली आहे. असे असले तरी काल अचानक मीठाचा साठा संपत असल्याची अफवा परिसरात पसरल्याने अनेक नागरिकांनी दुकानातून मीठ घेण्याचा सपाटा लावला. आरमोरी शहरातील एका दुकानातून एकाच दिवशी तब्बल 200 मिठाचे बॅग अडीचशे रुपये प्रमाणे विकल्याचे तेथील दुकानदाराने आमचे प्रतिनिधीला सांगितले. ही अफवा कुणी पसरवली हे मात्र गुलदस्त्यात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!