चिमढ्यात आरओ ठरलं कुचकामी – पाण्यासाठी बोंबाबोंब

चिमढ्यात आरओ ठरली कुचकामी – पाण्यासाठी बोंबाबोंब


मूल (अमित  राउत)

मूल तालुक्यातील चिमढा येथे पिण्यांच्या पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू असून, कोरोणामुळे एक तर घराचे बाहेर निघता येत नाही, तर दुसरीकडे दूरवर जावून पाणी आणण्याशीवाय पर्याय नाही अशा दुहेरी चक्रात महिला सापडल्या आहेत.

पिण्यांच्या पाण्यासाठी गावात सौर उर्जेवर चालणारी नळयोजना आहे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे सौजन्यातून आरओ मशीनही लावण्यात आली आहे.  सौर ऊर्जेवरील नळयोजना मागील अनेक महिण्यापासून बंद आहे, तर आरओ मशीन मागील दोन महिण्यापासून बंद आहे.  उन्हाळा सुरू असल्यांने, पिण्यांच्या पाण्याची अंत्यत निकड असतांना, जनतेला मात्र पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.  स्थानिक ग्राम पंचायतीचे पदाधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्यांचा गावकऱ्यांचा आरोप आहे.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडल्यास, पोलिसांच्या माराची भिती आहे, तर घरात पाणी नसल्यांने, बाहेर जाण्यावाचून पर्याय नाही.  बोअरवेलचे क्षारयुक्त पाणी गावकऱ्यांना पिण्यांसाठी वापरावे लागत असल्यांने, नागरीकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची भिती आहे.  

यंत्रणेकडून एटीएम दुरूस्ती करावी लागते, मात्र लॉकडाऊनमुळे नागपूर वरून यंत्रणा आणून, ती दुरूस्ती करणे सध्या शक्य नसल्यांचे  त्यांनी सांगीतले.  तशीच अडचण सौर ऊर्जेच्या नळयोजनेच्या बाबतीत ही आहे.            सरीता बोरूले,सरपंचा, ग्राम पंचायत चिमढा  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!