रमजान विशेष



रमजान विशेष
मुल १७ मे २०२०
सचिन वाकडे, मुल

दरवर्षी उत्साहात व आनंदात सर्वासमवेत साजरी होणारी रमजान यावर्षी मात्र जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू व देशात लागू असलेला जमावबंदी आदेश यामुळे सर्वासारखेच साध्या पद्धतीने व घरीच साजरी करण्याची वेळ मुस्लीम बांधवावर आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदासुध्दा माहे एप्रिल महिण्यात हजारो भरभराटवाला पवित्र रमजानचा महिना सुरु झालेला आहे. वर्षातून एकदा येणारा महिना रमजान आपल्यासोबत भरभराट घेऊन येते.
प्रत्येक मुस्लिमाला नमाज पठनावर कलमा, नमाज, रोजे, जकात (दान) कर्तव्य असते. रमजान महिन्याची सुरुवात 30 पासून होते. रमजानचा चंद्र दिसल्यावर मशीदीमध्ये तराविहची नमाज पठन सुरु होते. या महिण्यात दररोज इशाची नमाज झाल्यानंतर 20 रकअत विशेष नमाज पठन केली जाते. जिला तराविह म्हटल्या जाते.
तराविहच्या प्रत्येक नमाजसाठी सुन्नत आहे. पठन न केल्यास अपराध मानल्या जातो. पहिल्या रोजेपासून मशीदित नमाज पठन करणाऱ्याची संख्या वाढतच जाते. तराविहची नमाज अन्य दिवसांत पठन होणाऱ्या पाच वेळेच्या नमाजापेक्षा भिन्न असते. लहान मुलांपासून तर वृध्द व तरुण नमाजी सकाळच्या कर्तव्याची नमाजपासून पाचही नमाज व तराविहची नमाज सर्व मनापासून पठन केल्या जाते.
मगरीबच्या नमाजावेळी रोजा इफ्तियारीचे शानदार आयोजन प्रत्येक मशीदीत ठेवल्या जाते. 30 रोजे नंतर येणाऱ्या ईदसाठी बाजारात इत्र (अत्तर), कपडे, शेवई, मिठाई, खजूर व फळांची दुकाने उशीरापर्यंत सुरु असते. ईदची खरेदी मोठया प्रमााणात सुरु असते. गरिब श्रीमंत असे प्रत्येक आपल्या परिवारातील व्यक्तिंसाठी आपापल्या परिने वस्तु खरेदी करतात. मशीदीला आकर्षक रोषणाई केली जाते. गरिबांना दान वाटल्या जाते.
30 रोजे ठेवून ईदची नमाज पठन करुन प्रत्येक मुस्लिम नमाजी आपल्या अपराधाची माफि मागुन आनंदासाठी प्रार्थना करतात. ईशाअल्लाह पीरची मगरिबच्या सायंकाळी चंद्र नजरेस पडल्यावर तराविहची नमाज पठन केली जाईल व सहरीची (सकाळचे नाष्टा, जेवन करुन रोजे उपवास करणे) तयारी सुध्दा केली जाईल.
                  असे मानले जाते की, या महिन्यात चांगले काम केल्यावर अधिक पटिने सवाब (पुण्य) मिळते. या दरम्यान दिवसभरात साढे चौदा तासाचे रोजे ठेवल्या जाते. या महिन्यात रोजे ठेवण्यासोबतच पवित्र कुरआनची तिलावत (पठन) केली जाते. दररोज 5 वेळा नमाज होते. सकाळि 5 वाजता फजरची नमाज, दुपारी 1 वाजता जोहरची नमाज, 5 वाजता असरची नमाज, सायंकाळि 7 वाजता मगरिबची नमाज, त्यानंतर इशाची नमाज पठन केल्या जाते.
                      रमजानची 27 वी रात्र मोठी आणी अतीमहत्वाची असून रात्रभर जागरण करुन अल्लाहची प्रार्थना केली जाते. अल्लाहने मोहम्मद पैगंबरला कुराण दिले व मोहम्मद पैगंबरने ते मुस्लिमांसाठी जगापुढे आणले म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. 
रोजे ठेवण्याच्या अर्थ भुक - तहान यावर नियंत्रण ठेवणे नाहि तर आत्मसंयम नियंत्रण अल्लाहचा प्रती अकिदत (आस्था) आणि चांगल्या मार्गावर चालण्याच्या संकल्प आहे. रमजानच्या महिना लोकांना आपल्या आतमध्ये डोकावून पाहण्याच्या व स्वताचे मुल्यांकन करुन सुधरण्याची संधी देते. या पवित्र महिण्याचे सुरुवातीचे 10 दिवसांत अल्लाह आपल्या रोजेदारांचे अपराध माफ करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!