सरकारी जागेवरील नितेश शेंडे यांच्या विटाभट्टीच्या संबंधात आज चौकशी



चिमूर तहसिल चे तहसीलदार संजय नागटिळक व मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांच्या हस्ते

चिमूर - तालुका प्रतिनिधी ( केवलसींग जुनी )

चिमूर : - दिनांक.१८/०५/२०२० जांभुळघाट तलाठी साझा क्रमांक १५ अंतर्गत मौजा पारडपार येथे मौजा पारपार शिवारातील भुमापंन क्रमांक २३०/१ च्या हद्दीत,मौजा पारपार येथील नितेश बाळकृष्ण शेंडे हा सतत ५ वर्षांपासून विटा भट्टीचे काम मजूरा द्वारे करीत होता व आहे.
   
मात्र,२३०/१ हा भुमापन क्रमांक मोठ्या झाडाच्या जंगलाचा पट्टा असून,महशुल विभागाच्या कक्षेत समाविष्ट आहे.
     सरकारी जागेवर अवैधपणे मातींच्या विटांचा व्यवसाय नितेश शेंडे करीत असतांना,महशुल विभागाच्या सबंधीतांनी याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले होते.या संबंधात केवलसिंग जुनी ने बातम्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करीत प्रकरण उघडकीस आणले होते.
      सदर प्रकरणाची चिमूर तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी गंभीर दखल घेत,आज नितेश शेंडे प्रकरणाची मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असे केवलसिंग जुनी सोबत बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!