फोन पे च्या बनावट कस्टमर केयर नं.ने लंपास केली रक्कम


मूल (प्रतिनिधी)
फोन पे वरील बोगस कस्टमर केयरने मूल शहरातील एका मजूरांकडून 12203 रूपयाची ऑनलाईन लूट केल्याची घटना घडली. या ऑनलाईन लुटीची लेखी तक्रार करण्यात आली आहे. यशवंत दुलीराम लानगे असे या फसवणूक झालेल्या मजूरांचे नांव आहे.
युनियन बँ‍क ऑफ इंडियाच्या मूल शाखेशी जोडून यशवंत लानगे यांचा फोन पे अकांऊट आहे. त्यांनी या अकाँऊट मधून 3500 रूपये देतांना, चुकिचे दुसऱ्यांच्या खात्यात जमा झाले. ही बाब त्यांनी बँक व्यवस्थापक यांचे निदर्शनास आणून दिली. बँक व्यवस्थापनकांने, त्यांची तक्रार नोंदवून घेत, एकदा फोन पे च्या कस्टमर केयर शी संपर्क साधण्याची सुचना केली. त्यांचे सुचनेनुसार यशवंत लानगे यांनी गुगल वरून, फोन पे चे कस्टमर केयर चा नंबर शोधला. या नंबरवर लानगे यांनी संपर्क साधला असता, त्यांनी खात्याचे डिटेल्स घेतले आणि खात्यातून तब्बल 12203 रूपये परस्पर लंपास केले. खात्यातून ऐवढी मोठी रक्कम लंपास झाल्यांने हतबल झाल्यानंतर, त्यांनी राष्ट्रिय सायबर अपराध पोर्टलवर तक्रार केली. या तक्रारीची मूल पोलिसांनी शहानिशा केली असून, आपले पैसे परत मिळावे अशी मागणी लानगे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!