मूल तालुका कलाकार संघाची कार्यकारिणी जाहीर
झाडीपट्टी नाट्य कलावंत व गावा गांवातील लोक कलावतं दैन्यावस्था जाणून निदान जगण्यासाठी उपाय योजना करण्याकरीता
मूल तालुका कलाकार संघाची निर्मीती
मूल (प्रतिनिधी)
आम्ही मागील कित्येक वर्षांपासून मायमाऊली झाडीपट्टी च्या सुजाण प्रेक्षकांचे नाट्यक्षेत्रात काम करून मनोरंजन करीत आहोत.
मिळणाऱ्या मानधनात कुटुंबाची गुजराण, लेकरांच शिक्षण, त्यांचं आरोग्य व इतर कार्य पार पाडतात. हे करीत असताना आम्ही रोज २०० ते ४०० कि.मी. प्रवास करून सतत ४/५ महिने लोकांचं मनोरंजन करतो. दुर्दैवाने कित्येकदा प्रवासातील सकटांमुळे आमच्या कित्येक कलावंतांना जीव गमवावा लागला. तरीही आम्ही कलावंतांनी हे सेवेचं व्रत सोडलेल नाही. आम्ही आमचं जिवन सेवेला समर्पित केलं.
पण कोरोणा सारख्या आपत्ती मूळ आम्हा कलावंतांच कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. रोजीरोटी बंद झाली तर जगणे कठीण झाले आहे.एवढेच नव्हे तर शासना कडुन येणार्या योजनांचा लाभ तालुक्यातील खेड्या पाड्या तील कलावंत पर्यत पोहचावा या उद्देशाने तालुक्यातील बाल कलावंता पासुन ते वयवॄध्द कलावंतांनी आता एकत्र येवुन काम करायच अस निश्चय करत आज मुल तालुक्यातील बहुसंख्य कलाकारांच्या उपस्थितीत मुल तालुका कलाकार संघाची स्थापना करुन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली.
मुल तालुका कलाकार संघ
श्री.सुनिल कुकुडकर - अध्यक्ष
श्री.संतोष वरपल्लीवार -उपाध्यक्ष
श्री.मंगल राजे मशाखेत्री - सचिव
श्री.अनिल भाऊ मोहुर्ले - सहसचिव
श्री.रतीलाल कडस्कर - कोषाध्यक्ष







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!