चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी



चंद्रपूर : मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज दि.२६ मे रोजी राजुरा येथील भारत चौकात राहणारा शफीक शेख इमाम या २७ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन दिवसाआधी गोंडपिंपरी तालुक्यातील सुलेझरी येथील एका मजूराचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यात आता उष्माघाताचे दोन बळी गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असून ४६.६ डिग्री अंश सेल्सीअस पर्यंत पोहचले आहे. काल पासून नवतपा काळा सुरू झाला आहे. आठवडाभर उन्हाचा प्रकोप राहणार असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!