१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार आरोपीस अटक व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चिमुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा शेडेगाव येथील एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना दि. २५/०५/२०२० ला सायंकाळच्या सुमारास घडली सदर मुलगी हि अज्ञान असुन १४ वर्ष वयोगटातील कुमारीका असल्याचे पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते चिमुर वरोरा या राष्ट्रीय मार्गालगत असलेल्या शेंडेगाव या गावातील मुलगी हि घरामध्ये एकटी होती एकांतवासाचा फायदा घेत शेजारीच राहणाऱ्या आरोपी उमेश घनश्याम श्रीरामे वय २२ वर्ष जात माना रा. शेंडेगाव ता.चिमुर याने संधीचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरन संभोग केल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाल्याने चिमूर पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर घटनेनंतर आरोपी शेडेगाव लगत जंगल परिसरात लपून बसला असल्याची माहिती गावकऱ्यांना व पोलीस विभागाचे टिमला मिळताच लगेच रात्रौच्या वेळी चिमुरचे ठाणेदार स्वप्नील धुळे सर , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर, पोलीस उपनिरिक्षक राजू गायकवाड , अलिम शेख , महीला पोलीस उपनिरीक्षक कांता रेजिवाद , पोलीस हवालदार विलास निमगडे , विलास सोनूले , घनश्याम मेहरकुरे नेरी चौकी, नापोशी किशोर बोढे , पोलीस काँन्स्टेबल सतीश झिलपे, मनोज ठाकरे , भारत गोडवे, शैलेश मडावी , सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, रोशन तामशेटवार नेरी चौकी, कुणाल राठोड विशाल वाढई यांनी शोध घेवुन पिटीचुवा जंगल परिसरात आरोपीस पकडण्यात आले अवघ्या ६ तासाचे आत आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेवर सिआर,१८४ /२०२० सेक्स ३७६,३७६(२) {i} {i} ४५२ IPC RW ३४ पास्को अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात आली आहे.पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!